नांदेड(प्रतिनिधी)-अवधुत गिरडेच्या मारेकऱ्यांना काही तासातच स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले. चार मारेकऱ्यांमध्ये दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालके आहेत. म्हणूनच विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या कायद्यात बदल होण्याची नक्कीच गरज आहे. काही प्रमाणात एका समितीसमोर यांना हजर केल्यानंतर त्यांना नियमित गुन्हेगारांची वागणुक मिळत आहे. परंतू त्या समितीच्या कामातील वेळ खुप लागतो त्यामुळे सुध्दा मोठी अडचण होते.
काल दि.14 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास सिडको भागात अवधुत काळबा गिरडे (20) आणि त्यांचा सहकारी कृष्णा पुंडलिक गिरडे (20) या दोघांवर एका दुचाकीवर आलेल्या चार जणांनी शस्त्र हल्ला केला. त्यात अवधुत गिरडेचा मृत्यू झाला आणि कृष्णा गिरडे जखमी झाले. या प्रकरणी काळबा आनंदराव गिरडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार जणांच्या नावासह इतर अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला.
स्थानिक गुन्हा शाखेत एकच व्यक्ती आरोपी आणु शकतो असा विश्र्वास असणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, संजय केंद्रे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संग्राम केंद्रे, पद्ममसिंह कांबळे, देवा चव्हाण, मोतीराम पवार, मारोती मोरे, बालाजी यादगिरवाड, धम्मानंद जाधव, ज्वालासिंघ बावरी, गजानन बैनवाड, अर्जुन शिंदे एवढ्या लोकांना सोबत घेवून काही तासातच अवुधत गिरडेचा खून करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतले. त्यात दोन विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन बालक आहेत. इतर दोघांची नावे मनप्रितसिंघ उर्फ तेजु सरणसिंघ टाक (20) रा.एन.डी.41 जयभवानीनगर सिडको, सुमित संतोष सरोदे(19) रा.एन.डी.41 राहुलनगर सिडको अशी आहेत. स्थानिक गुन्हा शाखेने या दोघांना पुढील तपासासाठी गुन्हा क्रमांक 517/2023 साठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आदींनी स्थानिक गुन्हा शाखेच्या कामाचे कौतुक केले आहे.
अवधुत गिरडेच्या खून प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गाढवे हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने अवधुत गिरडेचे मारेकरी काही तासातच जेरबंद केले