नांदेड(प्रतिनिधी)-उमरी तालुक्यातील कारेगाव टी पॉईंटजवळ एका चार चाकी वाहनाला अडवून आम्ही बजरंगदलाचे कार्यकर्ते आहोत असे सांगून 5 हजार रुपये खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुध्द उमरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माधव आनंदा झुंजारे हा चालक आहे. तो आपली चार चाकी माल वाहतुक गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एच.5544 ही गाडी घेवून जात असतांना 15 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्यासुमारास उमरीजवळील कारेगाव टी पॉंईटजवळ त्या गाडीला सुनिल दत्ता बैनवाड आणि सचिन मधुकर जाधव दोघे रा.तळेगाव ता.उमरी यांनी अडवले. तुझ्या गाडीत गाय भरून कापण्यासाठी चाललास काय असे म्हणून आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत आम्हाला पाच हजार रुपये दे नाही तर पोलीस ठाण्यात चल असे बोलत थापड बुक्यांनी मारहाण केली, गाडीच्या समोरची काच फोडून टाकली या तक्रारीवरुन उमरी पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 341, 427, 323, 504, 34 नुसार गुन्हा क्रमांक 190/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कऱ्हे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते आहोत असे सांगून खंडणीची मागणी