नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर जबरी चोरीचा प्रकार घडला असून ही घटना बंदाघाट गोदावरी नदीपात्राजवळ घडली.बोधडी ता.किनवट येथून 3 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी चोरीला गेली.
शुभम प्रकाश धुतमल (20) रा.सुगाव ता.जि.नांदेड हे 12 जुलै रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान बंदाघाटजवळील गोदावरी नदी पात्राजवळ फिरत असतांना आणि व्हिडीओ बनवत असतांना एका व्यक्तीने त्याला येथे व्हिडीओ का बनवतो असे सांगून त्याच्या हातातील 60 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
बोधडी गावातून 3 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी चोरीला गेल्याची तक्रार निळकंठ दत्तात्रय कौठेकर यांनी दिली आहे. दि.14 जुलै रोजी सकाळी 5 ते 15 जुलैच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांनी आपली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डी.7008 ही भगवान बाबा चौक, शिवाजी ट्रेडर्स गोडाऊनसमोर उभी केली होती. ती गाडी कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार लखुळे अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी ; बोधडी येथून चार चाकी गाडी चोरी