सवेरा हॉटेलचे मालक शेख अफजल यांचा अपघात मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-अपघातग्रस्त झालेल्या गाडीच्या मदतीसाठी गेलेल्या एका युवकाला सिमेंट ट्रेलरने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तिन जण जखमी आहेत.
16 जुलैच्या मध्यरात्री मौजे खरबी फाटा या राष्ट्रीय महामार्गावर कोबी ही भाजी भरून जाणारी मालवाहु गाडी क्रमांक एम.एच.44 यु. 7861 पलटली. ही कोबी नागपूरकडे जात होती. या गाडीचा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला होता. अपघातग्रस्त गाडीतील कोबी भाजी दुसऱ्या गाडीत भरून पाठीविण्यासाठी नांदेड येथील शेख अफजल शेख फारुख (30) हे दुसरी गाडी घेवून तेथे गेले. शेख अफजल हे सवेरा हॉटेलचे मालक आहेत. अपघात झालेल्या गाडीतील कोबी भाजी दुसऱ्या गाडीत भरत असतांना यवतमाळकडे जाणारा सिमेंट ट्रेलर क्रमांक एम.एच.29 बी.ई.3395ने अफज आणि इतरांना धडक दिली. त्यात शेख अफजलचा मृत्यू झाला आहे. सोनखेड पोलीसांनी सिमेंट ट्रेलर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सिमेंट ट्रेलर सध्या सोनखेड पोलीसांच्या ताब्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *