नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथकाने आज मौजे कामठा शिवारात एका टिनशेडमध्ये अंमली पदार्थावर धाड टाकून 3 लाख 98 हजार 100 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. वृत्तलिहिपर्यंत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नांदेड जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी कामठा, कै.शंकरराव चव्हाण चौक, माळटेकडी परिसरात अवैधरित्या पॉपीस्ट्रॉ या अंमली पदार्थाची साठवणूक आणि विक्री होत होती. त्या ठिकाणी एका टिनशेडमध्ये पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ आणि डोडे सापडले. त्यात पॉपीस्ट्रॉ पावडर 54 किलो व बोंडे 41.6 किलो सापडले आहेत. ज्याची बाजारात किंमत 3 लाख 82 हजार 400 रुपये आहे. त्याच ठिकाणी 11 हजार 700 रुपये रोख रक्कम, वजन काटा व प्लॅस्टिकची पॉकिटे 4 हजार रुपयांची असा एकूण 3 लाख 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी ईश्र्वरसिंघ गुलाबसिंघ कटोरीया रा.नांदेड आणि अमर अशोक गंदीगुडे रा.सिडको या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
दहशतवाद विरोधी पथकाने 95 किलो अंमली पदार्थ पकडला