नांदेड(प्रतिनिधी)-एका अभियंत्याचे घर फोडून चोरट्यांनी 5 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार बालाजीनगर नांदेड येथील आहे. तसेच नवीन मोंढा कमानीसमोरून 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा ऍटो चोरीला गेला आहे.
अभियंता असलेले दिनेश हनमंतराव जमदाडे यांचे घर बालाजीनगर मध्ये आहे. दि.15 जुलैच्या सायंकाळी 5 ते 16 जुलैच्या रात्री 8 वाजेदरम्यान त्यांचे बालाजीनगर येथील घर फोडून चोरट्यांनी 4 लाख रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिणे असा 5 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव अधिक तपास करीत आहेत.
सिध्दांत रमेश मिसाळ यांनी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नवीन मोंढा कमानीसमोर आपला ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.3277 उभा करून जेवन करण्यासाठी घरी गेले ते एका तासानंतर आले तेंव्हा त्यांचा 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा ऍटो कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला होता. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेळके अधिक तपास करीत आहेत.
अभियंत्याचे घरफोडून 5 लाख 67 हजारांचा ऐवज लंपास ; ऍटो चोरला