
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरात साफसफाई करणाऱ्या कामगारांनी आज सकाळपासून संपाचे आंदोलन सुरू केले असून काम केले नाही. यामुळे शहरभर कचऱ्यांचे ढिग दिसत आहेत. वेतन मिळाल्याशिवाय काम करणार नाही असा पवित्रा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी घेतलेला आहे.
आज सकाळपासूनच सफाई कामगारांनी आर ऍन्ड बी इंफ्रा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन उभारले. नांदेड शहरातील सफाई करण्याचे कंत्राट ज्या कंपनीकडे आहे ती आर ऍन्ड बी इंफ्रा कंपनी वेळेत वेतन देत नाही, नियमित वेतन देत नाही असा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तो पर्यंत आम्ही काम करणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे कचरा, साफसफाई होणे अत्यंत गरजेची बाब असतांना सुध्दा कर्मचाऱ्यांनी हे अंादोलन पुकारले आहे. यामुळे शहरभर कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत.