नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी पाऊस पडत असतांना 5.30 वाजेच्यासुमारास रेल्वे विभागीय कार्यालयाजवळील शाळेसमोर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण मरण पावला आहे. धडक देणारी दुचाकी आणि त्यावरील स्वार पळून गेले आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमाकांत गजानन देसाई हे व्यक्ती पाऊस सुरू असतांना आपल्या दुचाकीवरून रेल्वे डिव्हिजन कार्यालयासमोरून येत असतांना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत उमाकांत गजानन देसाई यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारी दुसरी दुचाकी आणि त्यावरील दोन स्वार दुचाकी घेवून पळून गेले आहेत. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा माग काढत आहे.
एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला मागून दिली धडक; एकाचा मृत्यू