नांदेड (प्रतिनिधी)-धर्माबाद येथे दोन ठिकाणी, मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी अशा चार ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकण्यात आले आहेत. त्यात एकूण 24 जणांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार विलास शिवराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोहा ते नांदेड रस्त्यावर लोहा चौकात त्यांनी एका मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कार्यवाही केली.2860 रुपये रोख रक्कम जप्त केली आणि नारायण नामदेव पोवार (40), संतोष राम पौळ (22) या दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वेय लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 165/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार लाडेकर हे करीत आहेत.
मुदखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बालाजी श्रीहरी गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आंदर-बाहर नावाचा जुगार खेळणाऱ्या 8 जणांविरुध्द त्यांच्या तक्ररीवरुन गुन्हा दाखल झाला. त्यातील तीन जण पळून गेले आहेत. हे सर्व मंडळी नवी अबादी, रेल्वे खात्याच्या मोकळ्या जागेत आंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते. जुगार खेळणाऱ्यांमध्ये श्रीकांत नरसींग धुमाळे, महम्मद फेरोज महम्मद रहिम, सौरभ संजय चौदंते, शेख जमीर शेख महेबुब, माधव गंगाधर सोनकांबळे, युनूस थुली शेख रिजवान आणि सलमान युनूस पाणी बॉटलवाला अशा आठ लोकांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 143/2023 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मुंडे अधिक तपास करीत आहेत.या प्रकरणात 4100 रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे उमरी येथील पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ किशनराव झुंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धर्माबाद शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर साई बेकरी ऍन्ड कोल्ड्रींक या दुकानात चक्री नावाचा जुगार खेळणाऱ्या 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 61 हजार 930 रुपये रक्कम जप्त करण्यात आले आहेत. चक्री जुगार खेळणाऱ्यांची नावे सुधीर संग्राम बोडके, दीपक गोविंद वानखेडे, अब्दुल रशीद मोहम्मद भाई, महेश मलन्ना घोसलोड, संदेश रामा निजामकर, मोहम्मद जावेद मोहम्मद साबीर, लिंगन्ना मुगलन्ना पंदेरी, देवेंद्र गणपती कौडगिरे, यादव व्यंकट रामन्ना, व्यंकटरामन्ना राजरेड्डी, साईनाथ सुरकुंटवार अशी आहेत. यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 168/2023 दाखल करण्यात आला आहे. धर्माबादचे पोलीस अंमलदार स्वामी अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद येथील दुसऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा उमरी पोलीसांनीच मारला.त्यात उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र राजेंद्र कऱ्हे यांनी दिलेल् या तक्ररीनुसार रुद्रावार यांच्या इमारतीमध्ये साई बेकरी या दुकानात चक्री नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 169/2023 दाखल करण्यात आला आहे.जुगार खेळणाऱ्यांकडून 34 हजार 890 रुपये जप्त करण्यात आले आहेत. जुगार खेळणाऱ्यांमध्ये अजय सत्यनारायण धावणे, राजकुमार रमन्ना गौड, शेख जहांगिर शेख अजीज मोहम्मद युसूफ अली यांची नावे आहेत.
धर्माबाद येथे दोन चक्री जुगार अड्ड्यांवर उमरी पोलीसांनी मारला छापा; मुदखेड आणि लोहा येथे जुगारावर छापा