
नवीन नांदेड,(प्रतिनिधी)-सिडको एन. डी.४२, डी-३ भागातील ड्रेनेज लाईन नेहमीच तुंबलेला अवस्थेत असतात त्यामुळे ड्रेनेजचे पाणी घरामध्ये येऊन घरात दुर्गंधी निर्माण होते. तसेच संडास रुम व बाथरुम घरात भरुन वाहत आहेत. यामुळे अंघोळ करणे व संडासला जाणे अवघड झाले आहे व नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.या समस्येचा अनेक वर्षापासुन पाठपुरावा करुन सुद्धा महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे आज मनपा आयुक्त यांना येणा-या दहा दिवसात समस्येचे निवारण करावे अन्यथा महानगरपालिकेत आंदोलन व संबंधित अधिका-यांना घेराव करण्यात येईल असे निवेदन सिडको ब्लॅाक काॅग्रेस कमिटीचे सहसचिव अक्षय मुपडे यांच्यावतीने देण्यात आले.यावेळी काॅग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष रामराव सोनसळे व या भागातील अनेक नागरिक उपस्थित होते.