नांदेड(प्रतिनिधी)-चार लाखांच्या आसपास किंमतीचे अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी सहा दिवस अर्थात 24 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने काल दि.17 जुलै रोजी दुपारी कामठा शिवारातील एका टिनशेड मधून जवळपास 95 किलो पॉपीस्ट्रॉ आणि डोडे असा अंमली पदार्थ पकडला. या अंमली पदार्थांची किंमत 3 लाख 98 हजार 100 रुपये असा मुद्देमाल जप्त केला. दहशतवाद विरोधी पथकाने विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अंमली पदार्थ कायदा कलम 8, 17, 20 आणि 22 नुसार गुन्हा क्रमांक 245/2023 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.आर.दोनकलवार यांच्याकडे देण्यात आला.
आज 18 जुलै रोजी एस.आर.दोनकलवार पोलीस अंमलदार बंडू कलंदर, रामदास सूर्यवंशी, गृहरक्षक दलाचे जवान मेराज आणि सोनटक्के आदींनी दहशतवाद विरोधी पथकाने पकडलेल्या ईश्र्वरसिंघ गुलाबसिंघ कटोदीया (43), अमर अशोक गंदीगुडे (33) रा.सिडको, नांदेड या दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलीसांच्या विनंतीनुसार दोन्ही आरोपींना सहा दिवस अर्थात 24 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
95 किलो अंमलीपदार्थ बाळगणारे दोघे सहा दिवस पोलीस कोठडीत