नांदेड(प्रतिनिधी)-अतिरिक्त पडलेल्या पावसामुळे दोन बालकांना अंदाज आला नाही आणि ती दोन बालके आसना नदीच्या पाण्यात बुडून मरण पावली आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आसना नदी दुथडी भरून वाहत होती. कामठा (खुर्द) ता.जि.नांदेड या गावातील दोन बालके साईनाथ दशरथ चुनूरकर (16) आणि राहुल रमेश आठवले(17) ही दोन बालके नदी दुथडी भरून वाहत असल्याचा आनंद घेण्यासाठी नदीत उतरली. परंतू आजच्या परिस्थितीत आसना नदीमध्ये असलेल्या पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही आणि ही दोन्ही बालके बुडून मरण पावल्याचा दुर्देवी प्रकार आज सायंकाळी समोर आला.
घटनेची माहिती मिळताच अर्धापूर आणि विमानतळ दोन्ही ठिकाणचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले होते. ज्यांना चांगले पोहता येते अशा काही जणांनी बालकांचे मृतदेह नदीबाहेर काढले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती. गोदावरी जीवरक्षक दलातील नुर आणि त्यांच्या साथीदारांनी बुढालेल्या बालकांना नदीबाहेर काढले आहे.
