नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धनंजय वाय चंद्रचुड, न्यायमुर्ती संजय किशन कौल, न्यायमुर्ती संदीप खन्ना यांनी पारी केलेल्या एका आदेशानंतर मुंबई उच्च न्यायालयात मंजुषा अजय देशपांडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
मंजुषा अजय देशपांडे ह्या सक्षम वकील आहेत.32 वर्षापेक्षा जास्त त्यांनी वकीली व्यवसायात आपले योगदान दिले आहे. त्या कायद्याच्या शाखेत आणि घटनात्मक प्रकरणांमध्ये पारंगत आहेत. सन 2013 पासून मंजुषा अजय देशपांडे ह्या सरकारच्या पॅनलवर आहेत. औरंगाबाद खंडपीठासमोर मंजुषा अजय देशपांडेच्या नियुक्तीनंतर महिला वकीलांचे प्रतिनिधीत्व वाढेल. या सर्व प्रस्तावांचा उच्च न्यायालयातील कॉलेजियमने पुर्णपणे विचार करून, अभ्यास करून त्यांना मंजुषा देशपांडे यांना उच्च न्यायालयात न्यायमुर्ती पदावर विराजमान करण्याची शिफारस केल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली आहे. मंजुषा अजय देशपांडे ह्या उच्च न्यायालयातील दुसऱ्या महिला न्यायमुर्ती आहेत.
उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदावर मंजुषा अजय देशपांडे यांची नियुक्ती