नांदेड(प्रतिनिधी)-किनवट-माहूर रस्त्यावरील डॅम्पींग यार्ड परिसरात सुरू असलेला 52 पत्यांचा जुगार अड्डा दरोडेखोरांनी लुटून तेथून 15 लाखांपेक्षा जास्तचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. दरोडेखोरांकडे बंदुका होत्या. काही जण सांगतात त्या ठिकाणी तीन गोळ्या पण झाडण्यात आल्या होत्या.
प्राप्त माहितीनुसार 18 जुलै रोजी दुपारच्या वेळेस हा दरोड्याचा प्रकार घडला. जुगार या अवैध धंद्यावर मोदके घेणारे व्यक्ती वेगळेच असतात पण याचा फायदा दरोडेखोरांनी पण घेतला आणि काल 10 ते 12 दरोडेखोर या जुगार अड्ड्यावर पोहचले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून एक रुमाल जमीनीवर अंथरला आणि त्यात तेथे जुगार खेळणाऱ्या प्रत्येकाला आपल्या खिशातील पैसे बळजबरीने टाकायला लावले. सोबतच जुगार खेळणाऱ्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या-गळ्यातील सोन्याच्या चैन आणि मोबाईल सुध्दा या दरोडेखोरांनी बळजबरीने चोरून नेले आहेत. आपल्या जवळील सोन्याच्या वस्तु देणार नाही असा पवित्रा घेणाऱ्या काही जणांना या दरोडेखोरांनी चांगलाच झोप दिला.
आता दरोड्याची तक्रार कशी दाखल होणार याचा प्रश्न असेल तर नांदेड ग्रामीण आणि मुखेड पोलीस ठाण्यात अशा तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करून या दरोड्याची तक्रार सुध्दा देता येईल. तक्रार दिली तरच पोलीस प्रशासन दरोडेखोर शोधतील नाही तर पोलीस असेही म्हणतात आमच्याकडे काही आलेच नाही तर आम्ही काय करावे?
बंदुकीच्या धाकावर जुगार अड्डा लुटून 15 लाखांपेक्षा जास्तची लुट