नांदेड(प्रतिनिधी)-संपत्तीच्या वादातून नांदेड च्या वजिराबाद भागातील श्रीमंत व्यक्तीमत्वांमध्ये झालेल्या वादातून वजिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द फसवणूक करणे, खोटी कागदपत्र तयार करणे, खोटी कागदपत्र खरी आहेत अशा सदरांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
बाळकृष्ण हरीभाऊ महाजन(65) रा.महाजन कॉम्प्लेक्स तरोडेकर मार्केट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे नातलग शिवकुमार मधुकर महाजन, अशोक मानप्पा कटकम, अक्षतांत श्रीनिवासराव महाजन या तिघांनी मिळून अ नोंदणीकृत इच्छा मृत्यूपत्र तयार करून त्यावर वडीलांच्या सह्या करून इतर भावांच्या हक्कातील संपत्ती स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी मिळवली. सोबतच याबद्दल विचारणा केली असता अश्लिल शिवीगाळ केली. हा प्रकार बाळकृष्ण महाजन यांना 15 मे 2023 रोजी एका जाहिर प्रगटनातून कळला होता. यानंतर 18 जुलै रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे हे करीत आहेत.
महाजन कुटूंबियांमध्ये संपत्तीचा वाद; तिघांविरुध्द गुन्हा दाखल