नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी जवळपास १५ लाख रूपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काल रात्री वाजेगाव ते धनेगाव या रस्त्यावर पोलीस चौकीपर्यंत जाणार्या रस्त्यावर एका शटरला नांदेड ग्रामीण पोलिसांनी उघडून पाहिले असता त्यामध्ये विविध प्रकारचे गुटखे, सुगंधीत सुपारी आणि पॅकिंग करणारी एक मशीन सापडली. या सर्व ऐवजांची किंमत १५ लाख रूपये असल्याचा अंदाज आहे. हा सर्व गुटखा, सुगंधीत सुपारी आजीम याच्या मालकीचा आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील हे तक्रार देत आहेत. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झालेला नाही. ही सर्व कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली आहे.