नांदेड(प्रतिनिधी)-2020 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील परिक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरिक्षक झालेल्या चार जणांचा सन्मान करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खुप मेहनत केल्यानंतर ही वर्दी मिळते या वर्दीच्या अनुरूप जीवन जगण्यासाठी त्यांना शुभकामना दिल्या.
नांदेड येथील वैभाव प्रभाकर चव्हाण, अतुल प्रकाश आडे, परभणी येथील गजानन विठ्ठल कुबडे आणि हिंगोली येथील सागर शंकर कापसे या चार जणांनी 2020 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरिक्षक पदावर आपले नाव कोरले.
या चौघांना पुष्पगुच्छ देवून पुढील जीवनासाठी शुभकामना देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना संदेश दिला की, आयुष्यातील सगळ सुख त्यागण्याची हिंम्मत ठेवून तुम्हाला ही वर्दी मिळालेली आहे. या वर्दीची शान ठेवा. आपल्या आई-वडीलांना तुमच्या कर्तत्वातून लोक धन्यवाद देतील असे काम करा अशा शुभकामना दिल्या.
पोलीस उपनिरिक्षक झालेल्या चार जणांचा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केला सन्मान