नांदेड (जिमाका) – जिल्हयातील सर्व बस चालकांसाठी 20 जुलै 2023 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत करण्यात येणार आहे. या शिबिरात रस्ता सुरक्षिततेविषयी बस चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तरी सर्व बस चालक यांनी या शिबिरात नेत्र व आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. या शिबीरामध्ये आवश्यक असल्यास संबधीतास मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व बस चालक यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1 लाख 60 हजार व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. कित्येक लोकांना अपघातांमुळे कायमचे अपंगत्व येते. अशा व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक व मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. रस्ता सुरक्षितता ही परिवहन विभागाची महत्वाच्या जबाबदारीपैकी एक आहे. रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचण येतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी वाहन चालकाच्या आरोग्याची तसेच दृष्टी तपासणीसाठी संपुर्ण राज्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबीर आयोजित करण्याच्या राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली स्थापित रस्ता सुरक्षा संनियंत्रण समितीद्वारे या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
रस्ता सुरक्षितता ही परिवहन विभागाची महत्वाच्या जबाबदारीपैकी एक आहे. रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचण येतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासाठी वाहन चालकाच्या आरोग्याची तसेच दृष्टी तपासणीसाठी संपुर्ण राज्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबीर आयोजित करण्याच्या राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली स्थापित रस्ता सुरक्षा संनियंत्रण समितीद्वारे या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.