नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 मध्ये एका परिपत्रकाद्वारे बंद करण्यात आलेली दस्त नोंदणी पुन्हा सुरू करावी असे निवेदन मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निबंधक वर्ग-1 यांना संपत्ती खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या संघटनेने दिले आहे. या निवेदनावर जवळपास 75 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दि.17 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने एका परिपत्रकानुसार दस्तनोंदणी बंद केली होती. या निर्णयाला संदर्भ म्हणून या निवेदनात 9 वेगवेगळे न्यायालय निर्णय, परिपत्रक यांचा उल्लेख केलेला आहे. या निवेदनानुसार 12 जुलै 2021 रोजी नोंदणी महानिरिक्षक, मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे परिपत्रक काढून दस्तनोंदणी बंद केली होती. दस्त नोंदणी करायचीच असेल तर मंजुर अभिन्यास, अकृषीक परवाना, जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुर केलेल्या पोट विभाग व रेखांकन यासह इतर अनेक अटी लादल्या होत्या. या बाबत औरंगाबाद येथे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ते परिपत्रक रद्द करून निबंधकांना कोणतेही अभिलेख दस्तनोंदणी करतांना मागता येणार नाहीत असा निर्णय दिला होता. या निर्णयावर शासनाने अपील केले. परंतू ते फेटाळण्यात आले. सोबतच शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आजही त्या याचिकेवर नोंदणी क्रमांक प्राप्त झालेल्या नाही. म्हणजे 12 जुलै 2021 चे परिपत्रक रद्दच आहे. म्हणून दस्तनोंदणी पुर्ववत सुरू करावी आणि त्यामुळे होणारा अनेकांचा त्रास वाचवावा. नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू असे निवेदनात लिहिले आहे.
या निवेदनाच्या प्रति नोंदणी महानिरिक्षक पुणे, उपमहानिरिक्षक पुणे, उपसचिव महसुल व वन विभाग, जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर दिलीप गोणारकर, व्यंकटराव आडकिणे, प्रताप खडकेकर, सुनिल हिंगोले, विठ्ठल आंबाटे, रमेश काटके, मोहन कल्याणकर, पांडूरंग पावडे, तनिस शर्मा, आकाश गंगावाल, किसन पवार, दिगंबर सुर्यवंशी, प्रविण गवारे, आसनाजी पावडे, गणेश कदम, प्रविण जोशी, श्रीकांत पतंगे, गणेश घोरपडे, अर्जुन नागठाणे, रामराव राठोड, बालाजी चव्हाण, संतोष राठोड, संदीप पांडे, कामाजी शेळके, संतोष शिंदे, हौसाजी घोरबांड, शिवाजी पावडे, दिगंबर पाकुलवाड, माधव शिरसाठ, राजकुमार पावडे, धिरज शर्मा, बालाजी पवार, जीवन पावडे, बालासाहेब दमकोंडवार, विजय शर्मा, साईनाथ पावडे, मनोज चव्हाण, योगेश पावडे, राहुल राठोड, शेख अलीम शेख हमीद यांच्यासह 75 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
