मिशन स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानातर्गत निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

नांदेड (जिमाका)- मिशन स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियानातर्गत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीपूर्व विद्यार्थ्यांची फुड ॲन्ड ओबेसिटी या विषयावर निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची उर्स्फुत प्रतिसाद दिला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यामध्ये स्थुलतेबद्दल जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांचे मार्गदर्शन व जनऔषधशास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. पी.एल.गट्टाणी यांचे नेत्वृत्वाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. महावीर नाकेल यांनी केले तर या स्पर्धेसाठी डॉ. आय.एफ.इनामदार, डॉ. आर.डी.गाडेकर, डॉ. साईनाथ मैदपवाड, डॉ. अक्षय नलाबले, डॉ. भार्गव यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *