नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील प्रसिध्द अशा सालासर भजन मंडळाचे संस्थापक रामेश्र्वर तिवारी (वय 75) यांचे दि.20 रोज गुरूवारी सकाळी राहत्या घरी दु:खद निधन झाले.
दि.20 रोज गुरूवारी सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंतिमसंस्कार करण्यात आले. ते सालासर भजन मंडळाचे मुख्य संस्थापक होते. त्यांची अंतीम यात्रा राहत्या घरापासून गोवर्धनघाट अशी निघाली असता अंतविधीतील अनेकांनी भजन गात गात ही अंतिमयात्रा काढली. यावेळी नातेवाईक, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक व सर्व क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुल, मुलगी, सुन,जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे.
रामेश्र्वर तिवारी यांचे निधन