नांदेड(प्रतिनिधी)-बी.के.वेअर हाऊस एमआयडीसी नांदेड येथून सोयाबीनचे 35 पोते, 1 लाख 11 हजार 650 रुपये किंमतीचे चोरीला गेले आहेत. कापसी (बु) ता.लोहा येथे शाळेतून चोरट्यांनी 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड -नरसी रस्त्यावरील बिअर बार ऍन्ड रेस्टॉरंट फोडून चोरट्यांनी 36 हजार 770 रुपयांची दारु चोरली आहे. तसेच आमदुरा शेत शिवारातून 50 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे.
विवेक कंठीराम बस्वदे यांनी दिलेल्या तक्ररीनुसार ते बी.के.वेअर हाऊस एमआयडीसी येथील सुपरवाझर आहेत. दि.19 जुलैच्या मध्यरात्रीनंतर गोडाऊनमधील स्टॉक क्रमांक 4 एफ मध्ये असलेले 35 सोयाबीनचे पोते वजन अंदाजे 19 क्विंटल 25 किलो आणि किंमत 1 लाख 11 हजार 650 रुपयांचा माल कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे.नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक नरवटे हे करीत आहेत.
केंद्रीय प्राथमिक शाळा कापसी (बु) ता.लोहा येथील मुख्याध्यापक कोंडीबा वाघजी बैलके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जुलैच्या दुपारी 4.30 ते 13 जुलैच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान चोरट्यांनी शाळेच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून जुना टी.व्ही.30 हजार रुपये किंमतीचा चोरुन नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार व्ही.टी.तिडके अधिक तपास करीत आहेत.
रामराव सदाशिव जाधव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुखेड-नरसी रस्त्यावर त्यांचे मोहनावती बार ऍन्ड रेस्टॉरंट आहे.15 जुलैच्या रात्री 11 ते 16 जुलैच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी बारच्या पाठीमागील गेटचे कुलूप तोडून कॉन्टरमधील मॅगडॉल, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग अशा दारुच्या बॉटल्या आणि रोख रक्कम मिळून 36 हजार 770 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक अन्सापुरे अधिक तपास करीत आहेत.
बबनसिंघ गणपतसिंघ सपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे आमदुरा शिवारातील त्यांच्या शेतातून 18 जुलैच्या रात्री 10 ते 19 जुलैच्या पहाटे 3 वाजेदरम्यान आखाड्यावर बांधलेले 50 हजार रुपये किंमतीचे दोन बैल दावे कापून चोरून नेले आहेत. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आलेवार अधिक तपास करीत आहेत.
सोयाबीन पोते चोरी, शाळेतून चोरी, दारु चोरी, जनावर चोरी