तेलंगणा उच्च न्यायालयाने सर्व्हेक्षणासाठी दिले आदेश
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2019 मध्ये गुरूद्वारा बोर्डाला दान दिलेली तेलंगणातील 162 एकर 27 गुंठे जमीन उच्च न्यायालय तेलंगणाच्या आदेशाने सर्व्हेक्षण विभागाला त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही कार्यवाही तेलंगणा राज्यातील मनजितसिंघ यांच्या रिट याचिकेमुळे घडली. गुरूद्वारा बोर्डाच्या अनेक जागांसाठी मनजितसिंघ लढा देत आहेत.
सन 1919 मध्ये सरदार निहालसिंघ नंबरदार या व्यक्तीने 162 एकर 27 गुंठे जमीन तख्त सचखंड श्री.हजुर अबचलनगर साहिब यांना गाव आब्बापुर ता.जि.मुलूगु येथील दान केली होती. या जमीनीकडे नंतर कोणी पाहिलेच नाही. परंतू सरदार मनजितसिंघ यांनी उच्च न्यायालय तेलंगणा राज्याात रिट याचिका क्रमांक 12576/2022 दाखल करून मागणी केली होती की, या जमीनीचे पुन्हा एकदा सर्व्हेक्षण व्हावे. मनजितसिंघ यांनीही याचिका ऍड.वाय.रविंद्र प्रसाद आणि ऍड.जसप्रितसिंघ आणि ऍड.मोहम्मद कुरेश यांच्यावतीने दाखल केली होती. याबाबत सांगतांना मनजितसिंघ म्हणाले मी तेलंगणा उच्च न्यायालयाचा आभारी आहे. ज्यामुळे गुरूद्वारा बोर्डाच्या एवढ्या मोठ्या जमीनीबाबत उच्च न्यायालयाने दखल घेवून सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत.
गुरूद्वारा बोर्डाची 162.27 एकर जमीन तेलंगणा राज्यात आहे-मनजितसिंघ