नांदेड(प्रतिनिधी)-अतिवृष्टीमुळे जिल्हा त्रासला आहे. तरीपण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, उद्या शाळेला सुट्टी आहे, असे आदेश जिल्हा परिषदे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 48 तासांपासून अतिवृष्टी होत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार 22 जुलै रोजी सुध्दा नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करता नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दि.22 जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे.याच आदेशात इयत्ता 10 वी व इयत्ता 12 तसेच शासकीय वाणिज्य परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येतील असे सुचित केले आहे.
शनिवारी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी