किनवट (प्रतिनिधी)- किनवट येथे जुगार अड्डा लुटला की मटनाची पार्टी लुटली याच्या वाद असला तरी त्यातील एका अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकासह 12 जणांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. यापुर्वी असेच घडलेले दोन गुन्हे एक मुखेड येथे आणि एक नांदेड ग्रामीण येथे त्या दोन्ही गुन्ह्याची उकल सुध्दा आपल्या कामासाठी जीवाचे रान करणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकानेच केली होती.
18 जुलैच्या रात्री किनवट नगरपालिकेच्या डम्पींग ग्राऊंडजवळ एक दरोडा पडला. किनवट भागातील लोक सांगतात येथे जुगार खेळला जात होता आणि जुगार खेळणाऱ्यांची लुट करण्यात आली होती. त्यावेळी दहा ते बारा जण होते. दरोडेखोरांनी तलवारी आणि बंदुकीचा धाक दाखवला होता. एक गोळी सुध्दा चालवली होती. लुट केवढी झाली होती याचा अंदाज कोणालाच नव्हता.प्रसार माध्यमांनी आपल्या माहितीनुसार लुटीची रक्कम लिहिली होती.
20 जुलै रोजी आरफी अली इनायत अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 जुलैला सायंकाळी 5 वाजता किनवट डम्पींग ग्राऊंडजवळ किशन मुनेश्र्वर यांच्या शेतात पत्राच्या शेडमध्ये मटन पार्टी सुरू असतांना दरोडा पडला होता आणि त्या दरोड्यात 25 हजार हजार 25 रुपये रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या आणि चैन 90 हजार रुपयांच्या आणि 87 हजार 500 रुपयांच पाच मोबाईल दरोडेखोरांनी लुटले होते. या संदर्भाने भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 342, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 184/2023 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास किनवट येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोरे यांच्याकडे देण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळालेल्या माहिती आधारे त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेला मटन पार्टी लुटणाऱ्या लोकांना कोठून पकडून आणायचे याची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेने एकूण 12 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात एक अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. सोबतच मकोका गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत. इतर 11 जणांची नावे पुढील प्रमाणे आहेत. वैभव शिवराम गुरव (22) रा.व्यंकटेशनगर नांदेड, अंशुसिंघ राजेंद्रसिंघ मिलवाले (19) रा.गोविंदबागजवळ नांदेड, मुकेश चंदन जोगदंड (22), प्रशिक दिलीप ओढणे (24), चंद्रशेखर देवराव पाईकराव(24) रा.संघसेननगर नांदेड, ज्ञानेश्र्वर अनिरुध्द गाडगे(22) रा.सेनगाव ता.अर्धापूर, सय्यद सोयल सय्यद नुर(21), शेख मुबीन शेख गौस(21) रा.खुदबईनगर देगलूरनाका नांदेड, सय्यद इमरान सय्यद इसाक(27) रा.धनेगाव, सिताराम उत्तम काळे(26)रा.पळसा, विकास चंद्रकांत कांबळे (26) रा.पळसा ह.मु.धनेगाव नांदेड.
या 12 जणांमध्ये विकास चंद्रकांत कांबळेने 25 फेबु्रवारी 2023 रोजी सिडको भागात सप्रे नावाच्या युवकाचा खून केला होता. या अगोदर विकास कांबळे सविता गायकवाडवर गोळी झाडणाऱ्या गॅंगमध्येपण होता. विकास कांबळेवर दोन गुन्ह्यात अटक होणे बाकी आहे. तसेच त्याच्याविरुध्द मकोका सुध्दा लागलेला आहे.या 12 मध्ये अजून एक मुखेड येथील मकोका गुन्ह्याचा आरोपी आहे. त्याचे नाव वास्तव न्युज लाईव्हला स्पष्ट झाले नाही.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/20/किनवट-येथे-पडलेला-दरोडा-ज/