नांदेड(प्रतिनिधी)-आज सकाळी एका महिला पोलीस अंमलदाराच्या 25 वर्षीय मुलाने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्याने असे का केले याची माहिती घेतली असता कोणत्या तरी परिक्षेत त्याचा नंबर न लागल्याने असे त्याने केले असावे असे सांगण्यात आले.
मालेगाव रस्त्यावरील जैन मंदिराजवळ मनोहर तेलंग आणि त्यांच्या पत्नी नंदा तेलंग राहतात. नंदा तेलंग भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार आहेत. आज सकाळी त्यांच्या घरात शयन कक्षामध्ये त्यांचा मुलगा नरेंद्र मनोहर तेलंग (22) याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. याबद्दल माहिती घेतली असता तो बरेच दिवसापासून पुणे येथे राहत होता आणि कोणत्या तरी परिक्षेमध्ये त्याचा क्रमांक लागला नाही म्हणून त्याने असे कृत्य केले असावे असा अंदाज आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला आहे.
तेलंग परिवाराच्या दुःखात वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सहभागी आहे.