नांदेड(प्रतिनिधी)-कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांना हिमाचल प्रदेश पोलीसांनी पकडून नेले आहे. त्यांच्याविरुध्द दीड कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी तेथे गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना तीन ते पाच दिवसानंतर उघडकीस आली.
राजकीय क्षेत्रात बरेच चांगले नाव असलेले व्यक्तीमत्व मागच्या महानगरपालिकेत कॉंगे्रसचे नगरसेवक होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 17 ते 19 तारखांच्या दरम्यान हिमाचल प्रदेश पोलीस नांदेडला आली होती. अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांचे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फु्रट मार्केटमध्ये 5 क्रमांकाचे दुकान आहे. हिमाचल प्रदेश पोलीसांनी आपल्या येण्याची नोंद आणि अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांना घेवून जाण्याची नोंद पोलीस ठाणे विमानतळ येथे केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांचा मोठा फळ व्यवसाय आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदचे उत्पादन सर्वात जास्त होते. अशाच काही व्यवहारातून दीड कोटी रुपयांचा धनादेश न वठल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हिमाचल प्रदेश पोलीस अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांचे अटक वॉरंट घेवून नांदेडला आले होते. पण ही बाब मागील तीन ते पाच दिवस गुप्त राहिली. आज या घटनेचा उलगडा झाला आहे. हिमाचल प्रदेश मध्ये त्यांना नेल्यानंतर या प्रक्रिया झाली याबाबतची माहिती मिळवणे शक्य झाले नाही.