नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक टी.एस.डडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक तानाजी शिंदे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयंती दिनी अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, शामका पवार आणि विनोद भंडारे यांनी केले.
