नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या 112 क्रमांक गाडीचे मोबाईल डीव्हाईस ट्रॅकर गायब झाले की, चोरीला गेले याबद्दल तपासणी सुरू असून त्यातून सत्य समोर येईलच असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
काही दिवसांपुर्वी एमडीटी डाटा चोरीला गेल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. 112 क्रमांकाच्या गाडीवर अडचणीत असलेल्या लोकांना त्वरीत मदत मिळते म्हणून 112 क्रमांकाच्या गाडीवरील यंत्रणा ही योग्य राहणे अत्यंत आवश्यक आहे. परंतू काही दिवसांपुर्वी त्या गाडीमधील डाटा चोरीला गेला असे वृत्त प्रकाशीत झाले होते. काल दि.22 जुलै रोजी पोलीस अधिक्षकांनी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने हा प्रश्न विचारण्यात आला असतांना त्यांनी सांगितले की, रामतिर्थ पोलीस सांगतात डीव्हाईस गायब झाले आहे. बातमीमध्ये तो डीव्हाईस चोरीला गेल्याची माहिती प्रसिध्द झाली आहे. आम्ही या दोन्ही बाबींना तपासत असून त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.
प्रसिध्द झालेल्या बातमीमध्ये ही गाडी रामतिर्थ पोलीस ठाण्याची हद्द सोडून सुध्दा बाहेर जाते असा आशय होता. सोबतच वेगवेगळे आरोप त्या बातमीत होते. परंतू अत्यंत महत्वाचा असलेला मोबाईल डिव्हाईस ट्रॅकर ही यंत्रणा गायब झाली म्हणजे आता सध्या रामतिर्थ पोलीस ठाण्याची 112 क्रमांकाची गाडी कोणतेही काम करत नसेल काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण त्यावर येणारे कॉल हे केंद्रातून येतात आणि त्याची अंमलबजावणी स्थानिक पोलीसांना करायची असते.गायब झालेले डिव्हाईस लवकर सापडावे तरच या प्रकरणाचे खरे सत्य समोर येईल.
रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या गाडीतील एमडीटी गायब झाले की चोरीला गेले; तपासणी होणार-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे