नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्याचा तांदुळ भरलेला ट्रक अर्धापूर-नांदेड रस्त्यावर महामार्ग पोलीस चौकीजवळ पकडून त्याच्याविरुध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक दशरथ गोविंदराव तलेदवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास अर्धापूर महामार्ग पोलीस चौकीजवळ ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.9397 ची तपासणी केली असतांना त्यात पांढऱ्या पोत्यामध्ये भरलेले अंदाजे 30 टन वजनाचा स्वत: धान्याचा तांदुळ भरलेला होता. त्याची किंमत 9 लाख रुपये आणि ट्रकची किंमत 25 लाख रुपये असा एकूण 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालक शेख मोहम्मद शेख रहिम (34) रा.पाकिजानगर नांदेड आणि हरजी संभाजी राजेगोरे रा.शेलगाव ता.अर्धापूर या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.अर्धापूर पोलीसांनी अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1995 च्या कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा क्रमांक 242/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहेत.
सहाय्यक पोलीस अधिक्षकांच्या पथकाने स्वस्त धान्याचा तांदुळ भरलेला ट्रक पकडला