सराफा व्यापाऱ्याला लुटले ; ग्रामपंचायत कार्यालय फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-तीन अज्ञात दरोडेखोरांनी शिकाची वाडी ता.मुदखेड येथे 1 लाख 24 हजार रुपयांची लुट केली आहे. ग्राम पंचायत कार्यालय बोरवाडी ता.भोकर येथून 4 हजार 100 रुपयांची चोरी झाली आहे.
आनंदा काशीनाथ पांचाळ हे सोनखेड येथे सराफा दुकान चालवतात. 22 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास ते सोनखेड येथून वाजेगाव मार्गे पिंपळगावकडे जात दुचाकीवर जात असतांना सायंकाळी 7 वाजता त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले. त्यातील एकाने आनंदा पांचाळच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे ते चिखलात पडले. इतर दोन जणांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांची बॅग हिसकावून घेतली. या बॅगमध्ये 32 हजार रुपयांची चॉंदी, चार ग्रॅम सोन्याचे मनी 16 हजार रुपये किंमतीचे, 72 हजार रुपये रोख रक्कम आणि 4 हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. हा सर्व एकूण ऐवज 1 लाख 24 हजार रुपयांचा आहे. मुदखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 34 नुसार गुन्हा क्रमांक 151/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बोरवाडी ता.भोकर येथील ग्रामसेवक शिवकांत संभाजी मंगनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 जुलैच्या 4 वाजेपासून ते 20 जुलैच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान बोरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय फोडून त्यातील तीन बॅटऱ्या, एक इंव्हटर आणि एक फंखा असा 4 हजार 100 रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक देवकांबळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *