नांदेड(प्रतिनिधी)-एका पायाने अधु असलेल्या माजी कॉंगे्रस नगरसेवक अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांनी पलायन केलाचा कांगावा शिमला पोलीस करीत असली तरी ते काही खरे वाटत नाही. 19 जुलैपासून पोलीसांच्या ताब्यात असलेल्या हबीब बागवानचा पत्ता आजपर्यंत लागलेला नाही.हा प्रकार लोकशाहीतील प्रशासनिक प्रणालीवर प्रश्न उभा करणारा आहे.
नांदेड येथून 19 जुलै रोजी हबीब बागवान यांची चार चाकी गाडी रोखून दुसऱ्या एका चार चाकी गाडीत आलेल्या शिमला(हिमाचल प्रदेश) पोलीसांनी विमानतळ पोलीस ठाण्यात माहिती देवून चार चाकी गाडीत नेले. त्यांच्याविरुध्द 6/2023 असा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. 20 जुलै रोजी इटारसी गावात हबीब बागवान यांचा प्रवासी कोठडीचा आदेश न्यायालयातून घेतला. त्यानंतर हबीब बागवान धौलपूर रेल्वे स्थानकावरून पळून गेल्याचा गुन्हा भरतपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. धौलपूर आणि भरतपूर दोन्ही राजस्थानमधील जिल्हे आहेत. मग हबीब बागवान धौलपूरहून पळून गेले तर त्या प्रकरणाचा गुन्हा भरतपूर पोलीस ठाण्यात कसा दाखल करण्यात आला? यामुळे प्रशासनिक लोकांनी मिळून या प्रकरणातील तक्रारदार अनुप पाल यांच्या ताब्यात तर दिले नाही ना? अशी शंका यायला लागली आहे. हबीब बागवान हे एका पायाने अधु आहेत . अशा परिस्थितीत सुध्दा ते पळून कसे जातील? शिमला पोलीसांनी आणलेली चार चाकी गाडी त्यांनी इटारसीमध्ये सोडली आणि तेथून ते रेल्वेने प्रवास करू लागले. आपल्याकडे चार चाकी गाडी असतांना त्यांनी रेल्वेतून का प्रवास केला? या अनेक प्रश्नांमुळे शिमला पोलीस प्रशासन आणि गुन्हा क्रमांक 6/2023 चे तक्रारदार अनुप पाल यांनी काही तरी खलबत रचल्याचा अंदाज येतो.
खरे तर त्या गुन्हा क्रमांक 6/2023 मध्ये हबीब बागवान यांचे नाव आरोपी या सदरात नाहीच. त्या तक्रारीमध्ये त्यांचे वडील अब्दुल रहिम बागवान यांचे नाव आरोपी म्हणून आहे. हबीब बागवानला घेवून गेल्यानंतर तेथे जाऊन परत आले त्यांचे बंधू शकील बागवान यांनी सांगितले की, अनुप पालला दिलेले धनादेश हबीब बागवान यांच्या नावाचे होते. परंतू त्यांचे नाव एफआयआरमध्ये नाही. एकूणच घडलेला प्रकार ढोंग वाटण्यासारखाच आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/24/माजी-कॉंगे्रस-नगरसेवक-हब/