भोकर ग्रामीण रुग्णालयात चोरी; मंदिरात चोरी; शिक्षणाधिकारी कार्यालयात चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर ग्रामीण रुग्णालय फोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. वर्ताळा ता.मुखेड येथील विठ्ठल-रुक्मीणीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 36 हजारांचा ऐवज चोरला आहे. बिलोली येथे एक घरफोडून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जिल्हा परिषद कन्या शाळा फोडून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीचे दोन संगणक चोरून नेले आहेत.बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या गट विस्तार अधिकाऱ्याच्या पिशवीतील 50 हजार रुपये चोरट्यांनी चोरले आहेत.
भोकर येथील ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधिक्षक संजय नारायण देशमुख यंानी दिलेल्या तक्रारीनुसार दि.21 जुलैच्या दुपारी 2 ते 24 जुलैच्या सकाळी 10 वाजेदरम्यान कोणी तरी कार्यालय फोडून वाताणुकूलीत यंत्राचे सुट्टे भाग 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक दिगंबर पाटील अधिक तपास करीत आहेत.
वर्ताळा ता.मुखेड येथील विठ्ठल-रुक्मीणी मंदिराचे पुजारी माधव व्यंकटी आठकळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 9 ते 24 जुलैच्या सकाळी 5 वाजेदरम्यान कोणी तरी मंदिराचे कुलूप तोडून विठ्ठल रुक्मीणीच्या डोक्यावरील चांदीचे मुकूट, रुक्मीणी मातेच्या गळ्यातील सोन्याचे मनी आणि दागिणे असा 36 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 जुलैच्या सायंकाळी 6.30 ते 24 जुलैच्या सकाळी 9.15 वाजेदरम्यान जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेतील त्यांच्या कार्यालयावरील टिनपत्रा काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि 15 हजार रुपये किंमतीचे दोन संगणक चोरून नेले आहेत.वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गंगाधर कांबळे अधिक तपास करीत आहेत.
भारतबाई भिमराव रामटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलै रोजी रात्री 11 वाजता ते आणि त्यांचे कुटूंबिय घरात झोपी गेल्यानंतर कोणी तरी चोरट्यांनी घराच्या भिंतीवरून घरात उतरून त्यांच्या सासऱ्याच्या विलाजासाठी सांभाळून ठेवलेली 20 हजार रुपये रक्कम आणि काही सोन्या-चांदीचे दागिणे असा 55 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार सोनकांबळे हे करीत आहेत.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दत्तराम सिताराम महाजन हे 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा हदगाव येथे पैसे जमा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या हातात नॉनलॉन पिशवीत ठेवलेले 55 हजार रुपये कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चिंचोले अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *