मनपाची परवानगी न घेता अधिक श्रावण मास शिवनाम सप्ताहाचे बॅनर लावले; गुन्हा दाखल ; ही पहिली आणि शेवटी कार्यवाही ठरू नये हीच अपेक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-अधिक श्रावण मास अखंड शिवनाम सप्ताहाचे बॅनर बिना परवानगी लावले या कारणावरुन महानगरपालिकेेने बॅनर लावणाऱ्यांविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज केलेली कार्यवाही फक्त देखावा नसावा ऐवढी अपेक्षा मात्र महानगरपालिकेकडून आहे.
महानगरपालिकेने प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या पत्रकानुसार मुंबईमधील जनहित याचिका क्रमांक 155/2011 ची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या सुचनेनुसार 25 जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरतुल्लाह बेग, मालमत्ता व्यवस्थापक अजितपालसिंघ संधू आदींनी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 2 अशोकनगर हनुमानगड कमानीसमोर शिवकुमार हिरेमठ, हिरेमठ डेव्हलपर्स ऍन्ड बिल्डर्स यांनी महानगरपालिकेची परवागनी न घेता अनाधिकृत जाहिरात फलक लावल्याचे दिसले. त्यांच्याविरोधात सार्वजनिक संपत्तीस नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 च्या कलम 3 व महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 च्या कलम 3 नुसार जाहिरात निरिक्षक वसंत कल्याणकर यंानी दिलेल्या तक्ररीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रसिध्दी पत्रकात अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी शहरातील जनतेला आवाहन केले आहे की, महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच महानगरपालिकेची रितसर परवानगी घेवूनच जाहिरात फलक लावावेत अन्यथा नियमाप्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. बेकायदेशीररित्या फलक लावले असेल तर त्यावर कार्यवाही झाली ठिक आहे. परंतू ही कार्यवाही पहिली आणि शेवटची ठरू नये ऐवढीच अपेक्षा महानगरपालिका प्रशासनाकडून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *