नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या एका दबंग पोलीस अंमलदाराने मालेगावच्या मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून 2180 रुपये जप्त केले आहेत. चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुधडेअरीसमोर जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 39 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार गंगाधर विठ्ठलराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मालेगाव ते वसमत जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या शेजारी व्यंकट विश्र्वंभर शिंदे (30) अजय विलास साखरे (33) आणि तुषार जीवन वाघमारे हे सर्व मटका नावाचा जुगार चालवत होते. तेथे धाड टाकल्यानंतर 2180 रुपये जप्त करण्यात आले आहेत. तिघांविरुध्द अर्धापूर पेालीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 247/2023 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे शांतीराम रघुनाथ पांचाळ, शिवराज नारायण कुटल्यावाले, राहुल सदाशिवराव गायकवाड, शेख सुलतान शेख महेबुब, बाबु माधव गुट्टे, सतिश माधव जाधव यांच्याकडून त्यांचे मोबाईल व काही रोख रक्कम असा एकूण 39 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या सहा जणांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 542/2023 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार माने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने मालेगावमध्ये मटका जुगार पकडला ; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगारावर धाड