नांदेड(प्रतिनिधी)-आज सकाळी घडलेल्या एका दुर्देवी अपघातात पिरनगर येथे एक 18 वर्षीय युवक स्कुल बसच्या खाली आला आणि त्याचा मृत्यू झाला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार पिरबुऱ्हाणनगर जवळच पिर नगर आहे. आज सकाळी 8 वाजेच्यासुमारास सय्यद अरबाज सय्यद अकरम हा यशवंत कॉलेजमधील 12 वीचा विद्यार्थी आपल्या दुचाकीवर त्या भागातून जात असतांना एक युवती त्या रस्त्यावर चालत होती. समोरून एक स्कुल बस येत होती. त्या युवतीला आपल्या दुचाकीचा धक्का लागू नये आणि आपण बसच्या खाली येवू नये या प्रयत्नात त्या युवकाच्या गाडीचा धक्का त्या युवतीला लागलाच आणि तो रस्त्यावर खाली पडला आणि क्षणार्धातच समोरुन आलेल्या स्कुल बस खाली तो युवक चिरडला गेला. अनेकांनी त्याची मदत केली. परंतू तो बचावला नाही. सय्यद अरबाज हा मुळ रा.भोगाव येथील आहे.
संबंधीत व्हिडीओ…
अपघातात एका 18 वर्षीय युवकाचा मृत्यू