One Stop Shop चे उद्‌घाटन उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते-डॉ.संतुक हंबर्डे

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी वन स्टॉप शॉप सुरू करून असून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची सर्व औजारे, इतर साहित्य एकाच ठिकाणी प्राप्त होतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित दक्षीण ग्रामीण अध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे यांनी दिली. यावेळी उत्तर ग्रामीण विभागाचे भाजपाअध्यक्ष सुधाकरराव भोयर, नांदेड महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांची उपस्थिती होती.
आपल्या नियुक्तीनंतर या तिघांनी बोलावलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, देविदास राठोड, दिपकसिंह रावत, ठक्करवाड, अभिषेक सौदे, व्यंकटेश चाटे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना तिन्ही नवनियुक्त अध्यक्षांनी आप-आपली मते व्यक्त केली. त्यात पंतप्रधान किसान समृध्दी केंद्राचे उद्या उद्‌घाटन होणार असून याच उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी 18 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. किसान समृध्दी योजनेत शेतकऱ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या केंद्रामध्ये बि-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके आणि शेतकऱ्यांच्या गरजेसाठी लागणारे प्रत्येक औजार एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. या केंद्रात शेतकऱ्यांना आपली तक्रार सुध्दा नोंदवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *