नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे स्थानक रस्त्यावर सन्मान प्रेस्टिज या इमारतीत एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याप्रकरणी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी अत्याचार करणाऱ्याला 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या सन्मान प्रेस्टिजमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर दि.9 जुन 2023 रोजी सकाळी अत्याचार झाला. ही घटना या इमारतीमधील नामांकित हेअर ड्रेसिंग सेंटरमध्ये झाली. बालिकेला आपल्यावर घडल्या अत्याचारानंतर ती घटना आपल्या आई-वडीलांना सांगायला उशीर लागला आणि म्हणून त्यांनी 26 जुलै 2023 रोजी याबाबतची तक्रार दिली. वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 303/2023 दाखल केला. त्यात भारतीय दंड संहितेचे कलम 354, 354(अ) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 8 आणि 12 जोडण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे आहे. तक्रारीतील अत्याचार करणारा राहुल सुरेंद्र ठाकूर (31) ह.मु.सोमेश कॉलनी नांदेड मुळ रा.छोटाईपट्टी जि.दरभंगा(बिहार) यास अटक करण्यात आली. आज पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार मनोज राठोड, मेघराज पुरी, दत्तात्रय मुंडे आदींनी राहुल राठोडला न्यायालयात हजर केले.सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी या आरोपीला पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे. याचे सविस्तर सादरीकरण केले आहे. न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी राहुल ठाकूरला 28 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.