सिडकोतून अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या युवकाला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एका युवकाला नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्यानंतर आज विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी त्या युवकाला 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला विविध प्रकारे गोड-गोड बोलून एका युवकाने तिला 24 जुलै रोजी सोबत घेवून गेला.त्यानंतर तिच्यासोबत अनेक जागी अत्याचार केला. परंतू त्या बालिकेने आपली सुटका केली आणि त्यानंतर झालेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच ऍट्रॉसिटी कायद्यानुसा या प्रकरणातील आरोपी ओमकार परमेश्र्वर कोकुलवार (21) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. ओमकारला 25 जुलै रोजी अटक करण्यात आणि आज 26 जुलै रोजी नांदेड इतवारा पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी ओमकारला न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी या आरोपीला पोलीस कोठडी देणे का आवश्यक आहे याचे सादरीकरण केले. न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी ओमकारला दोन दिवस अर्थात 28 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *