नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयातील सहाय्यक संचालकाने 60 हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर काल त्याला अटक झाली. आज विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी सहाय्यक संचालकाला दोन दिवस अर्थात 28 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.13 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेच्यादरम्यान स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालय शिवाजीनगर नांदेड येथे संचालक लेखा परिक्षक संतोष हनमंतराव कंदेवार (25) यांनी ग्राम पंचायतीचे काम का देण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 60 हजार रुपये तडजोडीवर लाचेची मागणी केली. ग्राम पंचायतीचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ही लाच मागितली होती. याबद्दल काल दि.25 जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 238/2023 दाखल झाला. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संतोष हनंमतराव कंदेवारला कालच अटक केली होती.
आज लाच लुचप प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक गजानन बोडके आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी संतोष कंदेवारला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या समक्ष हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी पोलीस कोठडी मागणीचे सादरीकरण करतांना यांच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. अजून कोणाकडे लाच मागीतली काय?, बरेच फार्महाऊस व बरेच भुखंड घेतल्याची माहिती आहे त्याची तपासणी करायची आहे यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे सांगितले. न्या.एस.ई.बांगर यांनी संतोष कंदेवारला दोन दिवस अर्थात 28 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/26/सहाय्यक-संचालक-अडकला-60-हजा/