नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात बनविण्यात आलेला दक्षीण ते उत्तर असा पायी उड्डाणपुल आज घडीमध्ये अत्यंत घातक झाला आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने त्या पुलातील पदचारी रस्त्यावर खड्डे पडून लोखंड बाहेर आले आहे. यामुळे काही घातपात झाला तर त्याचा जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुरूद्वारा चौरस्ता येथून दक्षीण-उत्तर हा रस्ता पार करण्यासाठी एक उड्डाणपुल तयार करण्यात आला. जेणे करून श्री.सचखंड हजुर साहिब आणि गुरूद्वारा लंगर साहिब येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा व्हावा. परंतू ज्यावेळेस हा पुल तयार करण्यात आला. त्यावेळेस या कामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण शासनाचे काम होते आणि त्याच हिशोबाने ते झाले पण. पण या उड्डाणपुलाचा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही एक उपयोग झाला नाही. वर्षभरातून हजारो, लाखोंच्या संख्येत भाविक नांदेडला येतात. बऱ्याच सणांच्यावेळेस हल्ला-महल्ला ही निवडणुक निघते, काही वेळेस नगर किर्तन काढले जाते. त्यावेळी या पुलावर जास्त संख्येत लोकांनी उभे राहु नये म्हणून पोलीसांनाच मेहनत घ्यावी लागते. तरी पण तर काही लोक जातातच. काही वर तर काही पुलाच्या खाली अशा पध्दतीने या पुलाचा उपयोग झाला.
जून महिन्यात उसंत घेतलेल्या पावसाने जुलै महिना मात्र धुवून काढला.त्यामुळे सततधार पाऊस आणि कामाचा दर्जा या दोघांची जोड जमली नाही आणि या उड्डाणपुलावर आता खड्डा पडला आहे. सततधार पाऊस कधी थांबेल याचाही काही नेम नाही. म्हणजे पाऊस आणि पुलाच्या कामाचा दर्जा याला जोडून विचार केला तर भविष्यात या पुलामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोणाचा घात पातपण होवू शकतो अशा प्रकारचे अनेक पुल खाली पडले आणि त्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागले अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर असतांना आता तरी प्रशासनाने हा पुल काढून घ्यावा आणि लोकांना भविष्यातील अपघातापासून वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
