पावसाने माजवला हाहाकार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अनेक जुना सरकारी इमारतींमध्ये पाणी गळत असल्याने सर्वत्र धावपळ झाली आहे. पाणी काही थांबेना आणि त्रास काही बंद होईना अशी अवस्था झाली आहे.
शहरात तुडूंब पाऊस पडत असल्याने शहरातील सकल भागांमध्ये गुडघ्या ऐवढे पाणी साचले आहे. कोणीच घराच्या बाहेर जाऊ नये अशी अवस्था झाली आहे. या अवस्थेमुळे कोणतेही कामकाज शक्य झाले नाही. वेळोवेळी रस्त्यांची उंची वाढत गेल्यामुळे तळमजल्याची दुकाने रस्तयाच्या खाली गेली आहेत. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे, घरांमध्ये पाणी शिरले आहे. पण ज्यांची घरे कच्ची आहेत, ज्यांची घरे मातीची आहेत. त्यांना मात्र अवघड झाले आहे. एकंदरीत शहरात अनेक जागी शॉर्टसर्कीटमुळे आगी लागल्या आहेत. शहरातील गुरूकृपा मार्केटसमोर असलेल्या खांबाला आग लागली आहे. अद्यापही बऱ्याच सर्व बाबी माहित झाल्या नाहीत. परंतू सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला करत आहे.

लोणी खुर्द गावात एक व्यक्ती महादेव मंदिरात दर्शनाला गेला आणि लोणारी.नदीला जोरदार पावसाने पुर आला. त्यामुळे मंदिरात गेलेला व्यक्ती मंदिरातच अडकलेला आहे. वृत्तलिहिपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच आहे.

किनवट तालुक्यातील बोलोरी नाल्यामधून पावसामुळे नाला भरून वाहत असतांना अशोक पोशेट्टी दोनेवार आणि अजून एक व्यक्ती त्या पावसाच्या पाण्यातून नाला पार करत होते. अनेक लोकांनी त्यांना आवाज देवून न जाण्याबद्दल सांगितले परंतू त्यांनी ऐकलेच नाही. त्यातील एक व्यक्ती नाला पार झाला परंतू पोशेट्टी नदीतून वाहून गेला. काही लोकांनी सांगितले त्याला पोहता येते. परंतू वृत्त लिहिपर्यंत तो काही सापडलेला नव्हता. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *