नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगाव येथे चोरट्यांनी काही घरे फोडून त्यातून 6 लाख 3 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. बिलोली येथे एक घरफोडून चोरट्यांनी 29 हजार 500 रुपयंाचा ऐवज लंपास केला आहे. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हेबोरगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 60 हाजरांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखमापुर येथून 3 जणांनी पशुधन चोरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
मौजे डोंगरगाव येथील साहेबराव विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जुलैच्या पहाटे 5 वाजण्याच्या पुर्वी त्यांच्या घरातील ड्रेसींग टेबलमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 50 हजार रुपये असा 1 लाख 85 हजारांचा ऐवज तसेच त्यांचे शेजारी आनंदराव जाधव यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 88 हजार रुपयंाचा ऐवज आणि तुकाराम गंगाराम गिते यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 30 हजारांचा ऐवज मिळून एकूण 6 लाख 3 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. माळाकोळी पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार अधिक तपास करीत आहेत.
बिलोली येथे राहणारे औषध निर्माण अधिकारी श्रीनिवास व्यंकटराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेदरम्यान आपल्या सरकारी नोकरीवर नायगाव येथे गेले असतांना त्यांचे घरफोडून चोरट्यांनी चांदीचे विविध साहित्य आणि 10 हजार रुपये रोख रक्कम व काही नाणे असा एकूण 29 हजार 500 रुपयंाचा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार सोनकांबळे हे करीत आहेत.
शोभाबाई प्रकाश गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे कोल्हेबोरगाव येथे आणि त्यांचे पती 26 जुलै रोजी रात्री 9 वाजता झोपले. 27 जुलैच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांना जाग आली कि, कोणी तरी चोरट्यांनी घरफोडून घरातून सोन्याचे दागिणे एकूण 60 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार काळे अधिक तपास करीत आहेत.
मौजे लखमापुर ता.माहुर येथील सुरेशलालसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलै रोजी सकाळी 10 ते 24 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 1.45 वाजेदरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या घरात बांधलेल्या 8 शेळ्या अजिम कुरेशी रा.आर्णी जि.यवतमाळ, नारायण मारेाती गुडूलवार, विक्की लक्ष्मण गेडाम दोघे रा.कौठा बाजार, आर्णी जि.यवतमाळ यांनी चोरून नेल्या आहेत. माहुर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
डोंगरगाव ता.लोहा येथे तीन घरफोडून 6 लाखांची चोरी; इतर चोऱ्या