नांदेड सायबर पोलीस ठाण्याने 16 लाख 33 हजारांचे 110 मोबाईल शोधले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या सायबर पोलीस विभागाने जिल्ह्यातील एकूण 110 मोबाईल किंमत 16 लाख 33 हजार रुपये असा ऐवज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी परत दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात विविध सार्वजनिक ठिकाणावरुन अनेक जणांचे मोबाईल चोरीला जातात. त्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांनी तांत्रिक मदतीच्या आधारावर 110 मोबाईल शोधले. या सर्व मोबाईलची किंमत 16 लाख 33 हजार रुपये आहे. आज सर्व मोबाईल धारकांना बोलावून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांना त्यांचे मोबाईल परत केले. नांदेड पोलीसांनी या 110 मोबाईलची संपुर्ण माहिती मोबाईलच्या ईएमईआयसह नांदेड पोलीसच्या फेसबुक अकाऊंटवर आणि ट्विटरवर प्रसिध्द केली आहे. ज्या लोकांना आज बोलावणे शक्य झाले नाही त्यांनी आपल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक पाहुन ओळख पटवून सायबर पोलीस ठाणे नांदेड, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथून घेवून जाण्याचे आव्हान पोलीस जनसंपर्क विभागाने केले आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक जी.बी.दळवी, एस.एम.थोरवे, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेशमा पठाण, अनिता नलगोंडे, दाविद पिडगे, दिपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जयस्वाल, व्यंकटेश सांगळे, सौरभव सिध्देवार यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *