नांदेड(प्रतिनिधी)-जुना मोंढा भागात 26 जुलैच्या रात्री पृथ्वीसिंह तोमर यांचा खून करणाऱ्या बिल्लासिंगला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन-देसरडा यांनी 3 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.26 जुलैच्या रात्री 11 वाजेच्यासुमारास जुना मोंढा भागात भजे विक्री करणारा एक गाडेवाला यासोबत बिल्लासिंग उर्फ अमरसिंग हिरासिंग चिटोलिया (35) याचे भांडण झाले आणि बिल्लासिंगने पृथ्वीसिंह तोमरच्या पोटात, खातील, कानामागे आणि डोक्यात खंजीरने वार करून त्याचा खून केला. वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 308/2023 दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड यांच्याकडे देण्यात आला.
आज सहाय्यक पोलीस निरिक्षक मुत्येपोड आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी बिल्लासिंगला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती विनंती मान्य करत बिल्लासिंगला 3 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/27/खून-झाला-वजिराबाद-पोलीस-ठ/