नांदेड(प्रतिनिधी)-60 हजारांची लाच मागणाऱ्या स्थानिक निधी लेखा परिक्षा संचालक संतोष कंदेवारला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठविले आहे.
13 जुलै रोजी स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालय शिवाजीनगर येथे तक्रारदाराकडून 66 ग्राम पंचायतींचे लेखा परिक्षण करण्याचे काम तुला दिले म्हणून संचालक संतोष हनमंतराव कंदेवार (45) याने 60 हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संतोष कंदेवारला 25 जुलै रोजी अटक केल्यानंतर 26 जुलै ते 28 जुलै असे दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले होते. आज न्यायायलाने पोलीसांच्या विनंतीनुसार संतोष कंदेवारला न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठवून दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/26/60-हजारांची-लाच-मागणी-करणार/