नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील एका विवाहितेने परभणी जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदार असलेल्या आपल्या पतीसह सासरच्या पाच मंडळीविरुध्द हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची तक्रार कंधार पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील एका विवाहितेने परभणी जिल्ह्यात पोलीस अंमलदार असलेल्या संतोष श्रीराम नागरगोजे, त्यांचे वडील श्रीराम गुंडप्पा नागरगोजे, सासु राजश्री श्रीराम नागरगोजे, दीर श्रेयकुमार श्रीराम नागरगोजे आणि शोभा श्रीहरी घुगे यांच्याविरुध्द 5 लाख रुपये आणण्यासाठी माझ्या माहेरची मंडळी त्रास देत होती. मला व माझ्या आई-वडीलांना घरातून हकलून दिले होते. महिला केंद्रात याबाबत कार्यवाही केल्यानंतर महिला नांदेडने लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस अंमलदार संतोष नागरगोजे आणि त्यांच्या कुटूंबियांनी कंधार पोलीसांनी गुन्हा क्रमांक 22/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास कंधार येथील पोलीस अंमलदार श्रीरामे यांच्याकडे देण्यात आला आहे.
परभणी जिल्हा पोलीस दलातील एका अंमलदाराविरुध्द कंधार येथे गुन्हा दाखल