नांदेड(प्रतिनिधी)-27 जुलै रोजी बेल्लोरी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असतांना रस्ता पार करणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह आज सापडला आहे. पोलीस कायदेशीर कार्यवाही करत आहेत.
दि.27 जुलै रोजी बेल्लोरी गावातील काही लोक रस्त्यावर पाणी असतांना रस्ता पार करत होते. त्यातील एक जणाला हा रस्ता पार झाला. परंतू त्यातील अशोक पोशेट्टी दोनेवार याला काही तो रस्ता पार झाला नाही आणि तो वाहुन गेला. वाहुन जातांना आपल्या पोहचण्याचे कसब तो वापरत होता. परंतू त्याला त्यात यश आले नाही आणि तो काही सापडला नाही. हा प्रकार त्या ठिकाणी उभ्या असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. अतिवृष्टीने अशा प्रकारे जिल्ह्यात पाच ते सात जणांचा जिव घेतलेला आहे.
आज सकाळी अशोक पोशेट्टी दोनेवारचा मृतदेह पाऊस कमी झाल्यानंतर सापडला आहे.स्थानिक भोई समाजाचे व्यक्ती तो मृतदेह बाहेर काढत आहेत. 27 तारेखालाच अशोक दोनेवारबद्दल मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. आता त्या संदर्भाने किनवट पोलीस आकस्मात मृत्यूची कार्यवाही करत आहेत.
वाहून जातांनाचा व्हिडीओ….
बेल्लोरीच्या अशोक दोनेवारचा मृतदेह सापडला