नांदेड (प्रतिनिधी)-धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी चा सत्कार सोहळा कुसुम सभागृहांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. शिवाजीराव हाके होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे म्हणाले की मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकणार नाही व तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण रामकृष्ण धायगुडे, एस जी जी एसचे संचालक एम बी कोकरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमांची सुरूवात ५ वर्षीय कुमारी विरा हाके या चिमुकलीच्या सुंदर स्वागत गीताने झाली. या सत्कार सोहळ्यात एक झाड, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि गुलाबाचे फुल देऊन २६५ गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले. समाजभूषण म्हणून प्रा. मुरहरी कुंभारगावे यांचा काठी, घोंगड, अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा, स्मृतिचिन्ह व पुष्पहार घालून त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीराम श्रीरामे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सुनिता धुळगुंडे व भारत काकडे तर आभार राजेंद्र बदखडके यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीने परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. त्यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थित होती.