नांदेड(प्रतिनिधी)-सविस्ता गायकवाड यांच्यावर 9 जानेवारी 2023 रोजी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने पकडल्यानंतर आज इतवारा पोलीसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.10 जानेवारी 2023 रोजी सविता बाबूराव गायकवाड यांनी तक्रारी दिली की, 9 जानेवारीच्या रात्री 11.15 वाजता त्यांच्यावर बाफना पुल परिसरात त्यांच्यावर गोळीबार झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/2023 दाखल झाला. या फिर्यादीमध्ये सविता गायकवाड यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे दिली होती. परंतू पोलीस तपासात वेगळेच निष्पन्न झाले. त्यानुसार सविता गायकवाड यांनीच हा बनावट गोळीबाराचा प्रकार आखलेला होता आणि त्यांचे साथीदार किरण सुरेश मोरे, गोपीनाथ बालाजी मुंगल आणि विकास चंद्रकांत कांबळे हे होते.त्यातील पहिल्या तीन जणांना पोलीसांनी या गुन्ह्यात अटक केली. परंतू विकास चंद्रकांत कांबळे हा फरार होता. फरारी दरम्यान विकास कांबळेने सिडको परिसरात एक खून पण केला होता. त्याच्याविरुध्द मकोका कायद्याची कार्यवाही पण झालेली आहे.
22 जुलै रोजी स्थानिक गुन्हा शाखेने एका दरोडा प्रकरणातील 12 आरोपींना पकडले होते. त्यातील एक विकास चंद्रकांत कांबळे (27) रा.पळसा ता.हदगाव ह.मु.धनेगाव नांदेड हा होता. इतवारा पोलीसांनी यास काल दि.29 जुलै रोजी गुन्हा क्रमांक 12/2023 मध्ये अटक केली. पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार बोधमवार, नजरे देशमुख आदींनी विकास कांबळेला न्यायालयात हजर केले. न्यायालयात विकास कांबळेचा त्या गुन्ह्यातील संदर्भ पाहुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
